। लोकजागर । पुणे । दि. २८ फेब्रुवारी २०२५ ।
स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार घटनेतील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलीसांनी रात्री उशिरा अटक केली आहेे.
स्वारगेटहून फलटणकडे येणार्या २६ वर्षीय मुलीची स्वारगेट बसस्थानकात दिशाभूल करुन तिच्यावर अत्याचाराची घटना पुढे आली होती. या घटनेतील आरोपी सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यातील दृश्यांवरुन दत्तात्रय गाडे हा असल्याचे पुणे पोलीसांनी निष्पन्न केले होते. त्यानंतर दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पुणे पोलीसांची पथके कसून शोध घेत होती.
अखेर या आरोपीला रात्री १ ते २ च्या सुमारास शिरूर तालुक्यातील त्याच्या गुनाट या गावातून अटक करण्यात पोलीसांना यश मिळाले असल्याची माहिती समजत असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, सदर अमानूष घटनेचे संतप्त पडसाद ठिकठिकाणी उमटत असताना आरोपी विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.