“वीजबिल भरा अन् गैरसोय टाळा” महावितरणतर्फे फलटणकरांना जाहीर आवाहन

। लोकजागर । फलटण । दि. २१ मार्च २०२५ ।

मार्च अखेर ग्राहकांकडे वीजबिलाची काेट्यवधीची थकबाकी आहे. त्यामुळे बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे. थकबाकीमुळे महावितरणला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागते. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण फलटण शहर उपविभागामध्ये फलटण शहर-1, फलटण शहर-2, फलटण शहर-3 व सोमंथळी शाखा अशा ४ शाखा आहेत. उपविभागातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर मिळून थकबाकीदारांची संख्या 5147 इतकी असून त्यांच्याकडे 95.83 लाखांच्या जवळपास थकबाकी आहे.

वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने फलटण शहरात वारंवार रिक्षावर भोंगा लावून, ग्राहकांच्या दारात जाऊन वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांना नोटीसाही दिल्या आहेत. मात्र आता वसुलीसाठी केवळ दहा दिवसच शिल्लक असून आता थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरु आहे. तरी ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा त्वरित भरणा करुन गैरसोय टाळावी असे आवाहन महावितरण फलटण शहर उपविभाग यांनी केले आहे.

Spread the love