श्रीराम विद्याभवनमधील गुणवंतांचा डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते गौरव

। लोकजागर । फलटण ।

भारती विद्यापीठाच्या गणित पूर्वप्रथमा परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील पूर्वा अमित भोई हिने राज्यात व्दितीय क्रमांक,तर सोनाक्षी जगन्नाथ निकाळजे हिने इंग्रजी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवल्या बद्दल भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष शांताराम आवटे,श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे,आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ,मसाप फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख,मुख्याध्यापक मनीष निंबाळकर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

भारती विद्यापीठाची सुरुवात परीक्षा विभागातून झाली.विद्यापीठमार्फत गणित,इंग्रजी विषयाच्या ११ परीक्षा घेतल्या जातात.भारती विद्यापीठाच्या या परीक्षेत श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेच्या पुर्वा भोई आणि सोनाक्षी निकाळजे या विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे त्याचा मला अभिमान आहे.असेच प्रयत्न करत जा.यश निश्चित मिळेल.ध्येय मोठे ठेवा.कष्ट करण्याची तयारी ठेवा.असा सल्ला देत या दोघींचे भारती विद्यापीठ परिवार यांच्यावतीने डॉ.शिवाजीराव कदम यांनी अभिनंदन केले आणि दोघींना बक्षिस म्हणून रोख रक्कम देऊन त्यांचे कौतुक केले.

तसेच फलटण येथील साहित्यिक लेखक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांच्या चरित्राची डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईच्या कला शाखेच्या व्दितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल श्री.शेंडे यांचाही सत्कार डॉ.शिवाजीराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

रविंद्र बेडकिहाळ आणि आमचा ५७ वर्षांचा ऋणानुबंध आहे.५७ वर्षांच्या काळात भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमात रविंद्र बेडकिहाळ सहभागी नाहीत असे कधी झाले नाही.ते नियामक मंडळाचे सदस्य आहेत.त्यामुळे अनेक कार्यात त्यांचे नेहमी सहकार्य लाभले.

त्यांच्यामुळे आम्हाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी ज्ञात होतात असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे.त्यांचे पत्रकारिता, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

प्रारंभी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रविंद्र बेडकिहाळ, शांताराम आवटे, रविंद्र बर्गे, महादेव गुंजवटे, विक्रम आपटे, अलका बेडकिहाळ, मनीष निंबाळकर, अरुण खरात ,विशाल मुळीक, अमर शेंडे, बाळासो भोसले, किशोर पवार, धर्मराज माने, संजय चोरमले, नीलिमा मगदूम, धनश्री भिसे, कृष्णात बोबडे या सर्वांच्या उपस्थितीत डॉ.शिवाजीराव कदम यांचे स्वागत करण्यात आले.

Spread the love