श्री सद्गुरु शिक्षण संस्थेत दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. २८ जानेवारी २०२५ ।

२६ जानेवारी २०२५ रोजी श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या प्रांगणात 76 प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसमोर संचालन केले. तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय विशेष प्राविण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राजाकाका फणसे, संस्थेच्या सचिव अ‍ॅड सौ. मधुबाला भोसले, संस्थेचे सर्व संचालक व सर्व पदाधिकारी, सद्गुरु पतसंस्थेचे अध्यक्ष श्री तेजसिंह भोसले, श्री. रणजीतसिंह भोसले, सद्गुरु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री तुषार गांधी, सद्गुरु महाराजा संस्था समूहाचे सीईओ श्री संदीप जगताप यांच्यासह ब्रिलियंट अ‍ॅकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. नाजनींन शेख, आनंदवन प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री. प्रदीप कुमार चव्हाण, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटणचे मुख्याध्यापक श्री नागेश पाठक, प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालकांसह आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त सद्गुरु शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट असे झांज पथक नृत्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले.

Spread the love