भाजप – राष्ट्रवादीकडून फलटण शहरात प्रभाग पाहणी दौरा सुरु

। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ ।

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून फलटण शहरातील १ ते १२ या सर्व प्रभागांसाठी मंजूर झालेल्या प्रत्येकी ५० लाख रुपये निधीच्या पार्श्‍वभूमीवर द्यावयाच्या सुविधांसाठी भाजप – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभाग निहाय पाहणी दौरा सुरु केला आहे.

सदर दौर्‍याची सुरुवात प्रभाग क्रमांक १ मधून झाली. यावेळी फलटण नगरपरिषदेचे माजी गटनेते अशोकराव जाधव, भाजप पश्‍चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते रणजितसिंह भोसले, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, फलटण शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहूल निंबाळकर, देवा पाटील, प्रसाद पाटील, संजय गायकवाड, उमेश पवार, राहुल पवार, अमित भोईटे, अमोल भोईटे, सनी मांढरे, राजू निंबाळकर, महेश घाडगे, अमोल घाडगे, संदीप घाडगे, सुनिल घोलप, संग्राम सावंत, रमेश जाधव, संदिप जाधव, लतिफभाई तांबोळी यांच्यासह भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे माध्यमातून एकत्र फलटण शहरातील प्रभागांचा पहाणी दौरा आयोजित केला असून रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी नुकतेच प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख रूपये व नविन नाट्यगृहासाठी ८ कोटी रूपये मंजुर केले आहेत. यातील प्रत्येक प्रभागासाठी दिलेले ५० लाख रुपये गटर, पिण्याची पाईप लाईन व बोळांचे काँक्रीटीकरण करणे या साठी खर्च करावयाचे आहेत अशा सूचना रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने हा दौरा पार पडत असल्याचे भाजप – राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

Spread the love