क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अ‍ॅड.आकाश आढाव व मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

। लोकजागर । फलटण । दि. १० एप्रिल २०२५ ।

क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील युवा लेखक अ‍ॅड. आकाश आढाव व मित्र परिवाराच्यावतीने रविवार, दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ, फलटण येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पडणार्‍या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन फलटण वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन जाधव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, प्रजागटचे प्रमुख प्रदिप झणझणे, महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे बापूसो शिंदे, गोविंद भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तरी बहुसंख्य नागरिकांनी या रक्तदान शिबीरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन अ‍ॅड.आकाश आढाव, अ‍ॅड. जयवंत काकडे, सागर चव्हाण, अ‍ॅड. मनिष काकडे, अ‍ॅड. सुनिल अब्दागिरे यांनी केले आहे.

Spread the love