अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी

साताऱ्याला प्रथमच मान; जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राला लाभ

। लोकजागर । सातारा । दि. १० एप्रिल २०२५ ।

सातारकरांची मान अभिमानाने उंचवणारी साहित्य क्षेत्रात आणखी एक निवड झाली असून, मराठी भाषा, साहित्याला जगात पोहोचवणाऱ्या, देशातील सर्व साहित्य संस्थांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची निवड जाहीर झाली आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी पुण्याचे प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाहपदी सौ. सुनीताराजे पवार यांची निवड झाली आहे.

ग्रंथ, साहित्य प्रसाराला चालना देण्यासाठी पुणे येथे १८७८ साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. आजवर तब्बल ९८ साहित्य संमेलने झाली असून, महाराष्ट्रासह देशभरात या संमेलनांनी मराठी भाषेतील साहित्याला समृध्द करण्याचे प्रयत्न केले आहेत. तसेच जगभरात तब्बल ७ विश्व साहित्य संमेलने भरवून मराठी भाषेचा डंका जगभर पोहोचविला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत कोषाध्यक्षपदाची निवड आज, गुरुवारी (दि. १०) पुण्यात झाली. यामध्ये विनोद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आले. ते सध्या राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सद्स्य, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष आहेत. ही दोन्हीही पदे साताऱ्याला विनोद कुलकर्णी यांच्या रुपाने प्रथमच मिळाली आहेत.


विनोद कुलकर्णी यांनी जनता सहकारी बँक, सातारा ही अडचणीतून बाहेर काढत भक्कम आर्थिक स्थितीत आणली आहे. ‘छोट्या बँकेची मोठी गोष्ट’ हे जनता बँकेच्या वाटचालीवरील त्यांचे पुस्तक प्रसिध्द झाले आहेत. जनता बँकेच्या माध्यमातून अभ्यासिका सुरु करुन युवा पिढीला त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी मोलाची मदत केली आहे.

शाहूपुरी शाखेतून ‘ज्ञानगंगा’
विनोद कुलकर्णी यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास कतृर्त्वान पहाडासारखाच आहे. साहित्य क्षेत्रात येत, साताऱ्यातील साहित्य चळवळ वृध्दींगत करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा सुरु केली. साहित्यातील अनेक दिग्गज त्यांनी साताऱ्यात आणून त्यांच्या मुलाखत घेतल्या. कुलकर्णी यांनी शाहूपुरी शाखेतर्फे राज्यात सर्वप्रथम मराठी भाषा पंधरवडा सुरु केला. त्यातून सातारकरांनी ज्ञानगंगा लाभली. शाहूपुरी शाखा अध्यक्षानंतर ते मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी होते. आता ते कोषाध्यक्ष आहेत.

अभिजात भाषा : दिल्ली ते पत्रे…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी केलेले काम गौरवास्पदच ठरणारे आहे. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेवून त्यांची चक्क दिल्ली येथे आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्यातून तब्बल १ लाख पत्रे पाठविले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने आठ वर्षे पाठपुरावा केला आहे. चार दिवसांपूर्वी पुण्यात मराठी अभिजात भाषा दर्जा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी विनोद कुलकर्णी यांनी केलेल्या पाठपुराव्याचा जाहीरपणे कौतुक करुन गौरव केला आहे.

साहित्यिकांसाठी ‘ज्योत’
साताऱ्याच्या भूमीने अनेक दिग्गज साहित्यिकांना घडविले आहे. त्यातील एक म्हणजे आधुनिक कवी बा. सी. मर्ढेकर यांचे मर्ढे, ता. सातारा येथे स्मारक बांधण्यासाठी विनोद कुलकर्णी यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. मर्ढेकरांच्या घराचे नुतनीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. कवी गिरीष, बा. सी. मर्ढेकर यांचे पुतळे उभारुन वेगळे स्मारक रहिमतपूर येथे करण्यात त्यांचा पुढाकार आहे. साताऱ्याच्या साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान अनमोल असेच राहणार आहे.

दीड शतकात प्रथमच
पुणे जिल्हा सोडून पुणे परिसरातील जिल्ह्यासाठी दीड शतकात प्रथमच कोषाध्यक्ष पद मिळाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे घ्यायचे ते संमेलन नियोजितपणे पार पाडण्यात कोषाध्यक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची राहत असते. विनोद कुलकर्णी यांच्या निवडी सातारकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.  

Spread the love