फलटणमध्ये मुधोजी क्लबच्या नूतन इमारत कामाचे भूमिपूजन संपन्न

| लोकजागर | फलटण | दि. ८ ऑगस्ट २०२५ |

येथील मुधोजी क्लबच्या इमारत नूतनीकरण कामाचा भूमीपूजनाचा शानदार सोहळा विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले.

आपल्या भाषणात आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “मुलांनी मोबाईल गेम्सच्या ऐवजी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. क्रिकेटसारखे खेळ लहानपणापासूनच खेळणे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.”

यावेळी बोलताना आ. श्रीमंत रामराजे यांनी क्लबसाठी ‘कॉर्पोरेट मेंबरशिप’ सुरू करण्याची कल्पनाही मांडली. त्यांनी क्लबच्या सदस्यांनी सुचवलेल्या सुधारणांचे कौतुक केले. खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक (कोच) नेमणे आणि रात्रीच्या वेळी खेळासाठी फ्लडलाइट्स लावण्याचे महत्त्वही यावेळी सांगितले.

यावेळी मुधोजी क्लबचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, राजीव नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Spread the love