फलटणच्या नगराध्यक्षपदी समशेरसिंह नाईक निंबाळकर विराजमान; ‘नियोजनबद्ध विकासा’चा दिला शब्द

| लोकजागर | फलटण | दिनांक २९ डिसेंबर २०२५ |

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आज आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. यावेळी त्यांनी फलटण शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

पदभार स्वीकारण्याच्या या सोहळ्याला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, ऍड. नरसिंह निकम, मिलिंद नेवसे यांसह भाजपा, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक, समशेरसिंह यांचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वागत केले.

पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “फलटण शहराच्या विकासासाठी माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेन. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल.” यावेळी त्यांनी सर्व फलटणकरांचे आभार मानले. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love