कोळकी जिल्हा परिषद गटासाठी ६ कोटी ८० लाखांचा भरघोस निधी; जयकुमार शिंदे यांनी मानले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार

। लोकजागर । फलटण । शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ ।

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फलटण तालुक्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला असून, कोळकी जिल्हा परिषद गटासाठी सुमारे ६ कोटी ८० लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. याबद्दल भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी कोळकी गटातील जनतेच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

यावेळी बोलताना जयकुमार शिंदे म्हणाले की, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यामुळे फलटणच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागत आहे. या निधीबद्दल जयकुमार शिंदे यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी जि.प. सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर व स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

असा आहे मंजूर निधी (रस्ते विकास): कोळकी गटातील विविध गावे आणि वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी खालीलप्रमाणे निधीची तरतूद करण्यात आली आहे:

  • निरगुडी-विंचुर्णी-तावडी रस्ता: २ कोटी रुपये.
  • गिरवी ते दुधेबावी रस्ता: १ कोटी ५० लाख रुपये.
  • फलटण शिंगणापूर रोड ते फलटण पंढरपूर रोड (जोड रस्ता): ७० लाख रुपये.
  • निरगुडी ते सासकल रस्ता: ५० लाख रुपये.
  • जाधववाडी ते गिरवी रस्ता: ५० लाख रुपये.
  • सोनवडी ते पिंप्रद रस्ता: ५० लाख रुपये.
  • फलटण दहिवडी रस्ता ते सासकल रस्ता: ५० लाख रुपये.
  • भाडळी खु. ते पाटीलवस्ती रस्ता: ३० लाख रुपये.
  • सासकल ते झिरपवाडी रस्ता: ३० लाख रुपये.

सुमारे ७ कोटी रुपयांच्या या विकासकामांमुळे कोळकी गटातील दळणवळण सुलभ होणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्याचे नेतृत्व आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून फलटणचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे जयकुमार शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

Spread the love