श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या प्रांगणात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन २०२५’ संपन्न 

। लोकजागर । फलटण ।

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व एआयआर गुरुजी इंटरनॅशनल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या प्रांगणात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन २०२५’ संपन्न झाले.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविता सूर्यवंशी (बेडके) व मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने उद्घाटन झाले.

यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, सी. एल. पवार, नियामक मंडळाचे सदस्य सतीश पटवर्धन, महेंद्र सूर्यवंशी (बेडके), सदस्या सौ. ज्योती सूर्यवंशी (बेडके), सदस्य शिवाजीराव बेडके, प्रकाश तारळकर, सीईओ, गुरुजी इंटरनॅशनल इंडियाचे प्रताप पवार, प्रशासकीय अधिकारी एअर गुरुजी महाराष्ट्र राजेंद्र खवळे, विशाल अवताडे, प्रशालेचे प्राचार्य थोरात एस. बी., प्राचार्या सौ. सुरवसे व्ही. के., प्राचार्या सौ. गायकवाड, प्राचार्या सौ. काकडे, मुख्याध्यापिका सौ. बेडके, प्राचार्य काटकर, प्राचार्य उदय जाधव, उपप्राचार्य घनवट पी. डी., पर्यवेक्षक खरात के. एच., विज्ञान विभागप्रमुख साळुंखे पी. व्ही., ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, योगेश गंगतीरे, किरण बोळे, युवराज पवार, काका खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटीअंतर्गत सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापली उपकरणे सादर केली होती. दुपारच्या सत्रात यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन २०२५ चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

बक्षीस वितरण समारंभात विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये जवळपास १०० हून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या प्रदर्शनात इयत्ता चौथी ते सातवी लहान गटांमध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा काळज व लोणंद, सौ. वेणूताई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणमधील विद्यार्थिनींनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

इयत्ता आठवी ते दहावी मोठ्या गटांमध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव द्वितीय क्रमांक, सौ. वेणूताई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणने तृतीय क्रमांक मिळविला.

विशेष गौरव पुरस्कार २४ उपकरणांना देण्यात आले.

Spread the love