। लोकजागर । फलटण । दि. १० फेब्रुवारी २०२५ ।
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्य बाजारात रविवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी बाजरीची सर्वाधिक आवक झाली असल्याची माहिती, बाजार समिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
गत रविवारी (दि.9 रोजी) बाजार समितीत 485 क्विंटल बाजरीची आवक झाली असून प्रति क्विंटल किमान रुपये 2,200/- ते कमाल रुपये 3,252/- दर बाजरीला मिळाला. ज्वारीची 185 क्विंटल आवक झाली असून प्रति क्विंटल किमान रुपये 2,150/- ते रुपये 3,100/- इतका दर ज्वारीला मिळाला. तर गहू पिकाची 181 क्विंटल आवक झाली असून गव्हाला प्रति क्विंटल किमान रुपये 2,450/- ते कमाल रुपये 3,251/- इतका दर मिळाला. याचबरोबर 1 क्विंटल खपलीची आवक झाली असून प्रति क्विंटल रुपये 4,000/- इतका दर मिळाला.
मका पिकाची आवक 155 क्विंटल झाली असून प्रति क्विंटल किमान रुपये 2,100/- ते कमाल रुपये 2,370/-, घेवडा आवक 99 क्विंटल झाली असून प्रति क्विंटल किमान रुपये 3,500/- ते कमाल रुपये 5,500/-, तूर एकूण आवक 27 क्विंटल झाली असून प्रति क्विंटल किमान रुपये 4,800/- ते कमाल रुपये 6,65/-, हरभरा आवक 14 क्विंटल झाली असून प्रति क्विंटल किमान रुपये 5,000/- ते कमाल रुपये 8,000/-, मिरची (लाल) एकूण आवक 5 क्विंटल झाली असून प्रति क्विंटल रुपये 15,000/- तर मुग एकूण आवक 1 क्विंटल झाली असून प्रति क्विंटल रुपये 7,000/- इतका दर मिळाला.