फलटण आगारात आज दाखल होणार १० नवीन बस

| लोकजागर | फलटण | दि. १० फेब्रुवारी २०२५ |

फलटण आगारात १० नवीन बस आज रात्री दाखल होत असल्याची माहिती मिळत आहे.

फलटण आगारात नव्या बसेस ची कमतरता गेल्या अनेक दिवसापासून भेडसावत होती. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून आगारातील ही कमतरता आता सम्पणार आहे. आज रात्री उशीरा दापोडी, पुणे येथून अशोक लेलंड कंपनीच्या बी एस सिक्स प्रकारातील १० नवीन बसेस फलटण आगारात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

फलटण आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे यांच्या व्यवस्थापनात या १० नवीन बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार असल्याने प्रवासी वर्गासाठी ही बाब समाधानाची ठरणारं आहे.

Spread the love