फलटण शहरातील विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. १६ फेब्रुवारी २०२५ ।

फलटण शहरातील विकास कामांचा भूमिपूजन समारंभ माढा लोकसभा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हस्ते व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील, फलटण नगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.

शहरातील सोमवार पेठ येथील फलटण नगरपरिषद पाणीपुरवठा केंद्र येथे ३.४५ कोटी रकमेचा ६०० किलो वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणे तसेच फलटण नगर परिषदेसमोरील पार्किंग ग्राउंड येथे ५.९६ कोटी रक्कमेतून पार्किंग आणि शॉपिंग सेंटर उभारणी करणे या कामांचा भूमिपूजन समारंभ यावेळी संपन्न झाला.

कार्यक्रमास कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love