लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत आज भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचा पदवीप्रदान समारंभ

। लोकजागर । पुणे । दि. २६ फेब्रुवारी २०२५ ।

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालय, पुणेचा २६ वा पदवीप्रदान समारंभ आज गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ : ०० वाजता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या धनकवडी, पुणे येथील प्रांगणात होणार्‍या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचेा कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम भूषविणार आहेत.

यावेळी भारती विद्यापीठ कार्यवाह तथा भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे प्र. कुलगुरु डॉ विश्‍वजीत कदम, भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु डॉ.विवेक सावजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद यांच्याकडून ‘अ++’ दर्जा, विश्‍वविद्यालय अनुदान आयोगाकडून श्रेणी – 1 आणि राष्ट्रीय संस्थशत्मक रँकिंग फे्रमवर्ककडून ७८ वे स्थान प्राप्त असलेले भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे शिक्षण क्षेत्रातील नामांकित विश्‍वविद्यालय आहे.

Spread the love