शैक्षणिक सेवाभावी संस्थांना दिली भरीव आर्थिक मदत
। लोकजागर । फलटण । दि. दि. २३ मार्च २०२५ ।
जाधववाडी (ता.फलटण) फलटण येथील धनगर समाजाचे जागृत देवस्थान असलेल्या श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्टने फलटण तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणार्या संस्थांना आर्थिक स्वरूपात मदत देवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट हे सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे देवस्थान ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली जाते व अनेकांना मदतीचा हातही दिला जातो. याच पार्श्वभूमीवर नुकतीच फलटण तालुक्यातील कुरवली येथील वृद्धाश्रम, महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय व ताथवडा येथील सदगुरु गाडगे महाराज आश्रम शाळा या संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयाची भरीव अशी आर्थिक मदत श्री. बिरदेव ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. दत्ता चोरमले, सचिव सुरेश पोपटराव चोरमले, खजिनदार विष्णू चोरमले, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त अविनाश चोरमले, नेताजी चोरमले, विश्वस्त सुरेश चोरमले, विश्वस्त विठ्ठलराव चोरमले आदींच्या हस्ते ही मदत संबंधित संस्था चालकांकडे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली.