फलटणच्या डॉ. ओंकार देशपांडे यांची राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेचे क्रिडा वैद्यक अधिकारी म्हणून निवड

। लोकजागर । फलटण । दि. २४ मार्च २०२५ ।

फलटण येथील डॉ. ओंकार देशपांडे यांची ८ व्या इलाइट महिला राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेसाठी क्रिडा वैद्यक अधिकारी (स्पोर्टस् मेडिसीन डॉक्टर) म्हणून निवड झाली आहे. डॉ. ओंकार हे सध्या पंजाब येथील नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् मेडीसीन येथे आहेत.

ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथील शहीद विजयसिंग पथिक क्रिडा संकूल येथे ही राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धा दि. २१ ते २७ मार्च अखेर होत असून यामध्ये भारतातील नामवंत मुष्टीयोद्धा सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बॉक्सींग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजयसिंग, प्रसिद्ध ऑलींपीक खेळाडू खा. पी. टी. उषा, विजेंदर सिंग, सरीता देवी, निखत झरीन आदी उपस्थित होते.

डॉ. ओंकार हे फलटण येथील डॉ. द. ग. उर्फ गोटू देशपांडे व दंतचिकीत्सक डॉ. तेजस्विता देशपांडे यांचे सुपुत्र असून या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love