नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
। लोकजागर । फलटण । दि. 20 जून 2025 ।
दि. २० जून रोजी सकाळी पावसाचे प्रमाण पाहाता सकाळी ६ वाजता दोन हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. नागरिकांनी दक्ष रहावे असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी केले आहे.



