। लोकजागर । फलटण । दि. 20 जून 2025 ।
येथील श्री सदगुरु शैक्षणिक संकुलात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी मुलांच्या पाऊलांचे ठसे घेऊन वर्ग प्रवेश करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट ची उभारणी करण्यात आली होती. फुग्यांनी, कागदी फुलांनी शाळा सजविण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. अनुराधा गोडसे यांच्या हस्ते मुलांना पेन व पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. ब्रिलीयंट अॅकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, प्राचार्य नाजनीन शेख यांनी मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश पाठक यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे स्वागत केले.

अभिजीत चांगण यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.