‘सेवा भारती’ च्या वतीने पिंपरद जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

। लोकजागर । फलटण । दि. 25 जून 2025 ।

सेवाभारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प फलटण यांच्यावतीने मंगळवार दिनांक 24 जून 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरद (ता.फलटण) येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शिंदेवाडी (ता.फलटण) येथील ऐतिहासिक नाणी संग्रहक सचिन भगत, पिंपरद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हनुमंत शिंदे, सेवाभारती फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रकल्प प्रमुख पोपटराव बर्गे, निधी प्रमुख प्रशांत धनवडे, योगेश ढेकळे, सौ. भारती कुमठेकर, सौ. वर्षाताई बर्गे, चंदन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमावेळी सचिन भगत यांनी झाडे का लावली पाहिजेत, वृक्षारोपणाचे फायदे काय आहेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना झाडांसंदर्भांत अनेक ऐतिहासिक व चालू काळातील उदाहरणे दिली.

हनुमंत शिंदे यांनी सेवा भारतीचे उपक्रम कौतुकास्पद असून अशा उपक्रमाचा शाळेला लाभ होत आहे असे सांगून याबद्दल सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळेचे आभार मानले.

या वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रशांत धनवडे यांनी पेरू, चिंच, सिताफळ, पारिजातक, आवळा, जांभळ अशी एकूण 50 झाडे दिली. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा काकडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाची सुरुवात पिंपरद शाळेतील शिक्षिका सौ. मंगला कुलकर्णी यांनी उपस्थित प्रकल्प समिती सदस्यांच्या स्वागताने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समिती सदस्य योगेश ढेकळे यांनी केले.

कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love