। लोकजागर । फलटण । दि. 02 जुलै 2025 ।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सोहळा शनिवारी फलटण मुक्कामी विसावला. दरम्यान सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्यांना क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या वतीने एक लाख पंच्याहत्तर हजार रूपयांची औषधे मोफत वाटण्यात आली.

माऊलींच्या पालखी सोहळ्याच्यानिमित्ताने फलटण शहरात माऊली फौंडेशन, ब्राम्हण मध्यवर्ती सेवाभावी संस्था, युवक प्रतिष्ठान सातारा, सुनिल भगत युवक मित्र मंडळ कोर्हाळे, लायन्स क्लब फलटण, लोकमान्य मेडीकल फौंडेशन, डॉ.लाहाणे फौंडेशन, बिल्डर असोसिएशन आणि क्रिडाई फलटण आदी सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्थांच्या वतीने फलटण शहरात अनेक ठिकाणी आरोग्य विषयक शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या सर्व शिबिरांना लागणारी एक लाख पंच्याहत्तर हजार रूपयांची औषधे क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी पुरवली.

यावेळी खोखो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, मुंबई हायकोर्टाचे ऍड. विश्वनाथ टाळकुटे, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र जाधव, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे सदस्य विनय नेवसे, सोमाशेठ खलाटे, व्ही. एन. जाधव, जावेद तांबोळी, अनिल खलाटे, यश खलाटे, जेठवानी, यश घाडगे, शिवसेना आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष निमित शहा, शैलेश नलवडे, शिवसेना तालुका प्रमुख विकास नाळे, तात्यासाहेब तेली आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांतिसूर्य प्रतिष्ठान ही फलटण शहरात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी संस्था असून गेली तीन वर्षे पालखी सोहळ्यातील सहभागी वारकर्यांना मोफत औषधे वाटप करीत आहे. यावर्षी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे दीड हजार रुग्णांना एक लाख पंच्याहत्तर हजार रूपयांची मोफत औषधे वाटप करण्यात आली.
याकामी डॉ.श्रीपाल चिटणीस, डॉ.अरूण अभंग, डॉ.जयंत जगदाळे, डॉ.सुहास म्हेत्रे, डॉ.प्रसाद जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
