| लोकजागर | फलटण | दि. ९ ऑगस्ट २०२५ |
सासकल, ता. फलटण येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या औचित्याने कृषी विभागाच्या विविध योजनांच्या QR कोडचे अनावरण तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास पुरस्कारप्राप्त शेतकरी बबन मुळीक, उपकृषी अधिकारी (विडणी) अजित सोनवलकर, सहाय्यक कृषी अधिकारी (सासकल) सचिन जाधव, प्रगतशील शेतकरी नामदेव मुळीक, पोपट घोरपडे, तुकाराम मुळीक, विकास मुळीक, हनुमंत मुळीक, मनोहर मुळीक, कृषी सखी शिवाली जगदाळे व कोमल मुळीक उपस्थित होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी शाश्वत शेती, राष्ट्रीय नैसर्गिक शेती, फळबाग लागवड आणि फुलशेतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच विषमुक्त अन्नधान्य उत्पादनासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जाधव यांनी केले तर हनुमंत मुळीक यांनी आभार मानले. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कारप्राप्त शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांच्या फळबागेला प्रत्यक्ष भेट देण्यात आली.