फलटण पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

। लोकजागर । फलटण । दि. 23 ऑगस्ट 2025 ।

फलटण पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची घोषणा करण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आदेशान्वये ही अंतिम रचना जाहीर केली आहे. या घोषणेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींना आता वेग येणार असून, निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.

या अंतिम रचनेनुसार फलटण पंचायत समितीचे निवडणूक विभाग (गट) आणि त्याअंतर्गत येणारे निर्वाचक गण व त्यामध्ये समाविष्ट गावांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे :

१. जिल्हा परिषद गट : ४. तरडगाव

पंचायत समिती गण क्र. ७ – पाडेगाव:
समाविष्ट गावे: पाडेगाव, परहर खुर्द (पुनर्वसन), कुसूर, मिरेवाडी (कु), रावडी खुर्द, रावडी बुर्द, मुरूम, खामगांव, तडवळे, खराडेवाडी, कोंडार (पुनर्वसन).

पंचायत समिती गण क्र. ८ – तरडगाव:
समाविष्ट गावे: कोरेगाव, कापडगांव, तरडगांव, वरवंड (पुनर्वसन), माळेवाडी, शिंदेमाळ, विठ्ठलवाडी, डोंबाळवाडी, काळज, चव्हाणवाडी.

२. जिल्हा परिषद गट : ५. साखरवाडी – पिंपळवाडी

पंचायत समिती गण क्र. ९ – साखरवाडी-पिंपळवाडी:
समाविष्ट गावे: होळ, साखरवाडी-पिंपळवाडी, जिंती, फडतरवाडी.

पंचायत समिती गण क्र. १० – सस्तेवाडी:
समाविष्ट गावे: भिलकटी, खुंटे, शिंदेवाडी, चौधरवाडी, कांबळेश्वर, सस्तेवाडी, अलगुडेवाडी.

३. जिल्हा परिषद गट : ६. विडणी

पंचायत समिती गण क्र. ११ – सांगवी:
समाविष्ट गावे: सोमंथळी, सांगवी, सोनगांव, राजाळे, टाकळवाडे.

पंचायत समिती गण क्र. १२ – विडणी:
समाविष्ट गावे: धुळदेव, विडणी, माजेरी (पुनर्वसन), पिंप्रद.

४. जिल्हा परिषद गट : ७. गुणवरे

पंचायत समिती गण क्र. १३ – गुणवरे:
समाविष्ट गावे: गुणवरे, सरडे, साठे, मठाचीवाडी, खटकेवस्ती.

पंचायत समिती गण क्र. १४ – आसू:
समाविष्ट गावे: आसू, गोखळी, ढवळेवाडी (आ), पवारवाडी, जाधववाडी (आ), हणमंतवाडी, शिंदेनगर.

५. जिल्हा परिषद गट : ८. बरड

पंचायत समिती गण क्र. १५ – बरड:
समाविष्ट गावे: बरड, बागेवाडी, रांजणी (पुनर्वसन), मुंजवडी, राजुरी, भवानीनगर, विवर (पुनर्वसन), शेरेशिंदेवाडी, निंबळक, वाजेगांव (पुनर्वसन).

पंचायत समिती गण क्र. १६ – दुधेबावी:
समाविष्ट गावे: नाईकबोंमवाडी, दुधेबावी, तिरकवाडी, सोनवडी खुर्द, वडले, मिरढे, जावली, आंदरुड, कुरवली बुर्द, दत्तनगर.

६. जिल्हा परिषद गट : ९. कोळकी

पंचायत समिती गण क्र. १७ – कोळकी:
समाविष्ट गावे: कोळकी, गिरवी, धुमाळवाडी, सोनवडी बुर्द, भाडळी बुर्द, भाडळी खुर्द, बोडकेवाडी.

पंचायत समिती गण क्र. १८ – जाधववाडी (फ):
समाविष्ट गावे: झिरपवाडी, दालवडी, विंचुर्णी, कुरवली खुर्द, जोर कुरवली खुर्द (पुनर्वसन), तावडी, जाधववाडी (फ), ठाकुरकी, गोळेगांव (पुनर्वसन), सासकल, निरगुडी, मांडवखडक.

७. जिल्हा परिषद गट : १०. वाठार (निंबाळकर)

पंचायत समिती गण क्र. १९ – वाठार (निंबाळकर):
समाविष्ट गावे: वाठार (निंबाळकर), गोळेवाडी (पुनर्वसन), वाखरी, जोर-वाखरी (पुनर्वसन), ढवळ, उपळवे, दऱ्याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर, तरडफ, वेळोशी, शेरेचीवाडी (ढ), सपकळवाडी, खडकी, मिरेवाडी (दा), फरांदवाडी, उळंब (पुनर्वसन).

पंचायत समिती गण क्र. २० – सुरवडी:
समाविष्ट गावे: वडजल, रायरीगुडे (पुनर्वसन), काशिदवाडी, ढवळेवाडी (निं), मिरगांव, धामुणशी (पुनर्वसन), नांदल, हिरडोशी (पुनर्वसन), पानस (पुनर्वसन), काटवली (पुनर्वसन), मुळीकवाडी, घाडगेमळा, सुरवडी, निंभोरे, घाडगेवाडी.

८. जिल्हा परिषद गट : ११. हिंगणगाव

पंचायत समिती गण क्र. २१ – सासवड:
समाविष्ट गावे: मलवडी, सासवड, वडगांव, वाघोशी, पिराचीवाडी, ताथवडा, कोऱ्हाळे (पुनर्वसन), आळजापूर, बिबी, कापशी, टाकुबाईचीवाडी, झडकबाईचीवाडी, मानेवाडी.

पंचायत समिती गण क्र. २२ – हिंगणगाव:
समाविष्ट गावे: हिंगणगाव, परहर बुर्द (पुनर्वसन), आदर्की बुर्द, आदर्की खुर्द, शेरेचीवाडी (हिं), सालपे, कोपर्डे, तांबवे, चांभारवाडी, आरडगांव.

Spread the love