फलटण पालिकेची उद्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत : मुख्याधिकारी निखिल जाधव

। लोकजागर । फलटण । दि. 8 ऑक्टोबर 2025 ।

फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची प्रभाग निहाय आरक्षण सोडत उद्या दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन पाठीमागील इमारत (बीएसएनएल कार्यालयाजवळ) येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (गट-अ) निखिल जाधव यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण प्रक्रियेबाबत आदेश निर्गमित केले असून त्यानुसार नगरपरिषदेने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्‍चित केला आहे.

या सोडतीत नगरपरिषदेच्या विविध प्रभागांसाठी विविध सामाजिक प्रवर्गांचे तसेच महिला आरक्षणाचे वाटप निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे सर्व पक्षांचे नेते, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नगरपरिषद प्रशासनाकडून कार्यक्रमाच्या सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली असून, पारदर्शक पद्धतीने सोडत पार पडेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रभागांची व्याप्ती व सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे आहे :

  • प्रभाग क्रमांक १ (२ सदस्य) – नगर परिषद पाणीपुरवठा केंद्र, फिरंगाई मंदिर, सोमवार पेठ, श्रीराम साखर कारखाना परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसर.
    लोकसंख्या : ३५१४ (अ.जा ८१५, अ.ज १२९).
  • प्रभाग क्रमांक २ (२ सदस्य) – मंगळवार पेठ, बसस्थानक परिसर, पुणे रस्ता.
    लोकसंख्या : ३६४५ (अ.जा २९४६, अ.ज ०).
  • प्रभाग क्रमांक ३ (२ सदस्य) – आखरी रस्ता (पूर्व बाजू), उर्दू शाळा, कुरेशी मस्जिद परिसर, बुरूड गल्ली, कुंभार टेक परिसर.
    लोकसंख्या : ३५४३ (अ.जा १५१८, अ.ज ९).
  • प्रभाग क्रमांक ४ (२ सदस्य) – आखरी रस्ता (पश्चिम बाजू), पठाणवाडा, पाचबत्ती चौक, चांदतारा मस्जिद, जैन मंदिर, दगडी पूल परिसर.
    लोकसंख्या : ४२२३ (अ.जा २६६, अ.ज २७).
  • प्रभाग क्रमांक ५ (२ सदस्य) – शेती विद्यालय परिसर, जिंती नाका, बाणगंगा नदी हद्द, पुणे रोड, इंदिरानगर वसाहत.
    लोकसंख्या : ३५९३ (अ.जा ६३०, अ.ज ११).
  • प्रभाग क्रमांक ६ (२ सदस्य) – संतोषी माता मंदिर परिसर, जिंती नाका पेट्रोल पंप, हॉटेल महाराजा परिसर, निमकर सीड्स, बॅ. राजाभाऊ भोसले घर परिसर.
    लोकसंख्या : ३९६१ (अ.जा ३६७, अ.ज ०).
  • प्रभाग क्रमांक ७ (२ सदस्य) – संत बापुदास नगर, हनुमान नगर, सातारा रस्ता दोन्ही बाजू, मुधोजी कॉलेज परिसर, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर, चक्रपाणी मंदिर परिसर.
    लोकसंख्या : ३३९३ (अ.जा १८३, अ.ज १२).
  • प्रभाग क्रमांक ८ (२ सदस्य) – ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट, नगरपरिषद आरोग्य केंद्र, मारवाड पेठ, श्रीराम मंदिर, मुधोजी प्राथमिक शाळा.
    लोकसंख्या : ३८३७ (अ.जा ६३, अ.ज ७).
  • प्रभाग क्रमांक ९ (२ सदस्य) – गजानन चौक, नगरपरिषद परिसर, उमाजी नाईक चौक, मटन व मच्छी मार्केट परिसर, रविवार पेठ तालीम.
    लोकसंख्या : ४१०८ (अ.जा २४३, अ.ज २८).
  • प्रभाग क्रमांक १० (२ सदस्य) – बसस्थानक, घडसोली मैदान, शिंगणापूर रस्ता, शिवाजीनगर, खर्डेकर विद्यालय परिसर, जलमंदिर परिसर.
    लोकसंख्या : ४२९६ (अ.जा ४१४, अ.ज ४३).
  • प्रभाग क्रमांक ११ (२ सदस्य) – रायगड हॉटेल परिसर, महात्मा फुले शॉपिंग सेंटर, सिटी प्राईड परिसर, मुधोजी हायस्कूल परिसर, प्रशासकीय इमारत परिसर.
    लोकसंख्या : ३८३० (अ.जा २२१, अ.ज ३२).
  • प्रभाग क्रमांक १२ (२ सदस्य) – विवेकानंद नगर, दत्तनगर, कामगार कॉलनी, हणमंतराव पवार हायस्कूल परिसर.
    लोकसंख्या : ४१३० (अ.जा ७६६, अ.ज १८).
  • प्रभाग क्रमांक १३ (३ सदस्य) – पद्मावतीनगर, भडकमकर नगर, संजीवराजे नगर, इरिगेशन कॉलनी, आनंदनगर, विद्यानगर, महाराजा मंगल कार्यालय परिसर, लक्ष्मीनगर.
    लोकसंख्या : ६०४५ (अ.जा ६१५, अ.ज ७२).
Spread the love