। लोकजागर । फलटण । दि. 15 नोव्हेंबर 2025 ।
फलटण नगरपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या 6 व्या दिवशी एकूण 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज दि. 15 रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जानुसार अशोकराव जाधव यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक 5 व 7 मधूनही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून सचिन गानबोटे यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार, दिनांक 17 रोजी अखेरचा दिवस असून येत्या दोन दिवसात उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार आहे.
