। लोकजागर । फलटण । दि. १५ जानेवारी २०२६ ।
‘Ap न्यूज महाराष्ट्र’च्या सन २०२६ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळी बोलताना रवींद्र बेडकीहाळ यांनी डिजिटल युगातील पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘Ap न्यूज महाराष्ट्र’ने अल्पावधीतच आपल्या विश्वासार्ह बातम्यांच्या जोरावर जनमानसात स्थान निर्माण केले असून, या दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांनी वाचकांशी अधिक घट्ट नाते विणले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पत्रकार बांधवांची प्रमुख उपस्थिती
या छोटेखानी प्रकाशन कार्यक्रमास ‘Ap न्यूज महाराष्ट्र’चे संपादक प्रा. अमोल पवार, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी विकास शिंदे, साप्ताहिक लोकजागरचे संपादक रोहित वाकडे, दैनिक वसंत सागरचे प्रतिनिधी संदीप जाधव, आणि साप्ताहिक सातारा सम्राटचे शहर प्रतिनिधी जुबेर कोतवाल, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे यांची उपस्थिती होती.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत असतानाही प्रत्यक्ष मुद्रित स्वरूपात दिनदर्शिका प्रसिद्ध करून ‘Ap न्यूज’ने आपले अस्तित्व अधिक ठळक केले आहे. या उपक्रमाबद्दल फलटणमधील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. अमोल पवार आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
