राजघराण्यातील व्यक्तींविरोधात बेताल वक्तव्ये खपवून घेणार नाही ; शक्ती भोसले, पांडुरंग अहिवळे आणि अनिकेत अहिवळे यांचा इशारा

माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा केला निषेध

। लोकजागर । फलटण । दि. १६ जानेवारी २०२६ ।

फलटणच्या राजघराण्यातील व्यक्तींविरोधात बेताल वक्तव्ये करणे थांबवावे, असा इशारा राजे गटाचे शक्ती भोसले, पांडुरंग अहिवळे आणि अनिकेत अहिवळे यांनी दिला आहे. नुकत्याच भाजप-राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी राजघराण्यातील व्यक्तींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा या सर्वांनी संयुक्त प्रतिक्रियेद्वारे तीव्र निषेध नोंदवला आहे.

शक्ती भोसले म्हणाले, ‘‘ज्यांनी 30 वर्षे सत्ता दिली त्यांच्या विरोधात अशी वक्तव्ये करणे योग्य नाही. त्यांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी इथली जनता नाही.’’

पांडुरंग अहिवळे म्हणाले, ‘‘काल झालेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांनी असे कृत्य करु नये. श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत विश्‍वजीतराजे हे फलटणचे युवराज आहेत. इथून पुढे राजघराण्यावर अशाप्रकारे टीका केल्यास जशाच तसे उत्तर दिले जाईल.’’

अनिकेत अहिवळे म्हणाले, ‘‘इथले राजघराणे सुसंस्कृत आहे. त्यांना ऐतिहासिक वारसा आहे. त्यांनी लोकसेवा केलेली आहे. ज्यांनी त्यांच्या माध्यमातून वेगवेगळी पदे भोगली ते त्यांच्यावर बेताल टिका करत आहेत. त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी अशा वक्तव्यांना आळा घालणे गरजेचे आहे.’’

Spread the love