पेपर वर्क सुरु; कारवाई आज संपेल : श्रीमंत संजीवराजे

। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।

‘‘पेपर वर्क सुरु आहे, कारवाई आज संपेल’’, असा विश्‍वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला आहे.

गोविंद मिल्कचे प्रमुख तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाकडून सुरु असलेल्या चौकशीचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशीही कार्यकर्त्यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी श्रीमंत संजीवराजे यांनी गेटवर येऊन कार्यकर्त्यांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी ‘‘पेपर वर्क सुरु आहे. आज कारवाई संपेल’’, अशा शब्दात श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.

Spread the love