भाजप २५ – ० च्या फरकाने फलटण नगरपालिका जिंकेल : रणजितसिंह नाईक निंबाळकर

अमोल भोईटे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

। लोकजागर । फलटण । दि. १३ फेब्रुवारी २०२५ ।

”फलटण शहरात युवकांची ताकद भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी राहणे आवश्यक होते. अमोल भोईटे यांच्यासारख्या धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या रुपाने फलटण शहरातील भाजपमधील ही पोकळी भरुन निघाली आहे. मोठे प्रवेश झाले आहेत; आणखीन बाकी आहेत. येणार्‍या नगरपालिका निवडूकीत जर वॉर्ड २५ च राहिले तर २५ – ० च्या फरकाने भारतीय जनता पार्टी फलटणची नगरपालिका जिंकेल’’, असा विश्‍वास माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

फलटण शहरातील राजे गटाचे युवा कार्यकर्ते अमोल भोईटे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अमोल भोईटे म्हणाले, ‘‘फलटण शहराचा अर्धवट राहिलेला विकास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पुर्ण होईल असा विश्‍वास आहे. विकासाची ही कास धरुन त्यात आपलाही वाटा असावा म्हणून आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे.’’

Spread the love