आमदार सचिन पाटील यांनी जनतेला केले समस्या पाठवण्याचे आवाहन

आगामी अधिवेशनात महत्त्वपूर्ण विषय विधानसभेत मांडणार

। लोकजागर । फलटण । दि. १३ फेब्रुवारी २०२५ ।

येत्या ३ मार्च २०२५ पासून महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर फलटण – कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांनी मतदारसंघातील लोकांना आपल्या भागातील प्रश्‍न, समस्या आणि अडचणी पाठवण्याचे आवाहन केले असून यातील महत्त्वपूर्ण विषयांना आपण विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

नागरिकांच्या मनातील प्रश्‍न विधिमंडळात मांडण्याचा आमदार सचिन पाटील यांचा मानस असून त्यानुसार मतदारसंघातील लोकांनी आपल्या भागातील प्रश्‍न, समस्या आणि अडचणी मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत फ्लॅट नं. १६, रामटेक अपार्टमेंट, महाराजा मंगल कार्यालयाशेजारी, फलटण येथील जनसंपर्क कार्यालयात लेखी स्वरुपात जमा कराव्यात, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Spread the love