१९ फेब्रुवारी रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय परिपत्रक जारी

। लोकजागर । मुंबई । दि. १४ फेब्रुवारी २०२५ ।

दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत शासकीय विभागांना उद्देशून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिनांक १९ फेब्रुवारी रोजी येणार्‍या जयंतीचे औचित्य साधून ज्या ज्या ठिकाणी त्यांचे पुतळे / स्मारके आहेत तेथे रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करुन घेवून ते झाल्याची खातरजमा संबंधित विभाग प्रमुख यांनी करुन घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करुन सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. तद्नंतर छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. आदी सूचनांचा समावेश सदरच्या परिपत्रकात करण्यात आला आहे.

Spread the love