सांगवीत बेकायदेशीर दारु विकणार्‍यांवर कारवाई

। लोकजागर । फलटण । दि. २२ फेब्रुवारी २०२५ ।

सांगवी (ता.फलटण) येथे बेकायदेशीर दारु विक्री करणार्‍यांवर फलटण ग्रामीण पोलीसांनी कारवाई केली असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१ रोजी सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सांगवी ता. फलटण गावच्या हद्दीत मुमताज अहमद शेख (वय ५५), रा. सांगवी, ता. फलटण ही महिला स्वत:च्या घराच्या आडोशास बेकायदेशीररित्या विनापरवाना देशी दारुची विक्री करताना आढळून आली. त्यामुळे सदर महिलेवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी (ता.फलटण) येथील दुसर्‍या एका घटनेत दि. २२ रोजी १२ : ३० वाजण्याच्या सुमारास मौजे भिमनगर (सांगवी) गावच्या हद्दीत दादासो उर्फ मामड्या बाबू मोरे, वय ४६, रा. भिमनगर, ता.फलटण हा आपल्या राहत्या घराच्या आडोशास विनापरवाना, बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारुची चोरटी विक्री करीत असताना आढलून आला. त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनिमियांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love