। लोकजागर । फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२५ ।
राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांचे पिताश्री भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भगवानराव गोरे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज दिनांक २५ फेब्रुवारी सकाळी ११ : ०० ते ४ : ०० वाजेपर्यंत बोराटवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार असून अंत्यविधी बोराटवाडी (ता. माण) येथे आज दुपारी ४ : ०० वाजता होणार आहे.