। लोकजागर । फलटण । दि. ०६ मार्च २०२५ ।
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोशल मिडीयावर वाहत्या पाण्यातील मृत कोंबड्यांचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर फलटण शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ नीरा – उजवा कालव्याचा असून तोन ते तीन हजार मृत कोंबड्या या कालव्यात टाकण्यात आल्या असल्याचा दावा आ. श्रीमंत रामराजे यांनी केला असून नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून संबंधित विभागाकडून मात्र या प्रकाराबाबत अद्याप कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही.