। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२५ ।
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा आज सोमवार, दिनांक ११ रोजी दुपारी ०१ : ३० वाजता येथील सजाई गार्डन येथे भव्य नागरी सत्कार संपन्न होणार आहे. या सत्कार समारंभाचे आयोजन फलटण उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

सुनिल फुलारी यांना केंद्र सरकारच्या वतीने उत्कृष्ठ प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने होत असलेल्या या सत्कार समारंभास सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर यांची प्रमुख उपस्थिती उपस्थिती लाभणार आहे.