। लोकजागर ।सातारा । दि. १५ मार्च २०२५ ।
जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, सातारा यांचे अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिकांचे भूमि अभिलेख विभागा संबंधित समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी १९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, सर्व्हे नं. २८३/१अ, फ्लॅट नं. १, राधिका रोड, करंजे तर्फ सातारा येथील सातारा सिटी बिझनेस सेंटर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आजी, माजी सैनिकांनी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख विभागाकडे काही समस्या, प्रश्न असल्यास त्याबाबतच्या पुराव्याच्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडू करण्यात आले आहे.