वासंतिक विशेषांकासाठी कवी लेखकांना आवाहन

। लोकजागर । मुंबई । दि. २२ मार्च २०२५ ।

साप्ताहिक करवीर काशीच्यावतीने प्रसिद्ध होणार्‍या ‘वासंतिक’ विशेषांकासाठी लेखन साहित्य पाठवण्याचे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत ‘ऋतूनां कुसुमाकरः’ असे संबोधले आहे. कवीवर्य जगदेव तर वसंताचे वर्णन करताना थकत नाहीत. निसर्गाकडे एक अजब जादू आहे. त्यामुळे मानवी वेदनांवर त्याचा असा काही असर होतो, की सगळी दुःखे, वेदना पार विसरायला होतात. निसर्गाचे हेच सानिध्य कायम मिळत राहिले तर मग काय मानवी जीवनात बहारच येईल. वसंत ऋतुच्या चैतन्यदायी स्पर्शाने सृष्टी फुलून निघते. जीवनात वसंत ऋतुच्या आगमनामुळे दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणात दूर होतात, आणि म्हणूनच वसंत ऋतूत सर्व चांगल्या चळवळींचे निर्भीड मुखपत्र म्हणून लोकादरास पात्र झालेल्या साप्ताहिक करवीर काशी चे वतीने वासंतिक विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे.तरी या अंकासाठी लेख, कविता, चारोळ्या आदी साहित्य १५ एप्रिल २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत,असे आवाहन अतिथी संपादक धनंजय आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.

साहित्य पाठविण्याचा पत्ता:
साप्ताहिक करवीर काशी कार्यालय, पैस, वसंतराव सरनाईक पार्क, देवकर पाणंद, कोल्हापूर-४१६००७.
व्हाट्सअप : 9420351352
ईमेल- [email protected]

Spread the love