। लोकजागर । फलटण । दि. दि. २३ मार्च २०२५ ।
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त आज रविवार, दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्यावतीने ‘रक्तदान महायज्ञ’ हा रक्तदान शिबीराचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर शिबीरातील प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहन पर भेट म्हणून शिवकथाकार विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ हे शिवचिरित्र देण्यात येणार आहे.

फलटण तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, धारकरी, शिवशंभू भक्तांनी या शिबीरात सहभागी होवून मोठ्या संख्येने रक्तदान करावे. अधिक माहितीसाठी 9503657933, 9096608061, 9890182282, 9975970957 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.