। लोकजागर । फलटण । दि. २४ मार्च २०२५ ।
सोनगाव (ता. फलटण) येथील सोनगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोनगाव सोसायटीचे माजी चेअरमन पोपटराव बुरुंगले यांनी ठरलेला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर नूतन चेअरमन निवडीची प्रक्रियार पार पाडताना सोसायटी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गरुडकर यांच्याकडे संदीप पिंगळे यांचा एकमेव अर्ज सादर झाला. त्यानंतर सुनील गरुडकर यांनी संदीप पिंगळे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सोसायटी सदस्य उपस्थित होते. सदर निवडीबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी संदीप पिंगळे यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सोनगाव ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न
दरम्यान, चेअरमन निवडीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सोनगाव ग्रामस्थ व गावातील सार्वजनिक संस्थांच्यावतीने सोसायटीचे नूतन चेअरमन संदीप पिंगळे, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा राजाळे सर्कलचे मुख्याध्यापक धनाजी मोरे व ‘सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका’ पुरस्कार प्राप्त सौ. मनिषा संदीप पवार यांचा सत्कार समारंभ सोनगाव बंगला येथील श्री हनुमान मंदीरात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी संतोष गोरवे उपस्थित होते. तर सदाशिव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर सत्कारास उत्तर देताना संदीप पिंगळे यांनी सांगितले की, ‘‘गावानी व सोसायटी सदस्यांनी दाखवलेला विश्वास कधीच तुटून देणार नाही. समाजासाठी आणि सोसायटीच्या प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत राहीन.’’ तर ‘‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असून ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीत अधिक वाढ झाली आहे’’, असे मुख्याध्यापक धनाजी मोरे यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पोपटराव बुरुंगले, विकास पाटील, योगेश एजगर, अक्षय थोरात, सुनील पाटील, जय्याप्पा बेलदार, चंद्रकांत निकाळजे, बाळासाहेब ओवाळ, योगेश बुरुंगले, सुखदेव बेलदार, सौ. आशाताई थोरात, राजेंद्र टेंबरे, श्रीकृष्ण बंडगर या सर्व सोसायटी सदस्यांसह रामचंद्र बेलदार, सुखदेव बेलदार, यशवंत धायगुडे, महादेव कदम, महादेव लवटे, गोरख लवटे, बाबा लवटे, मा.मुख्यध्यापक रमेश जगताप, रमेश जगताप, बापू पाटील, अरुण लांडगे, शिवाजी भोसले, राहुल बेलदार, दीपक बेलदार, संदीप बेलदार, हनुमंत थोरात, शंकर पिंगळे, दयानंद पिंगळे, ज्ञानदेव थोरात, नितीन पिंगळे, प्रकाश पिंगळे, मनोज मोरे, संतोष मोरे, महादेव पिंगळे, अतुल पिंगळे, अक्षय बेलदार, मनोज बल्लाळ, शहाजी सुळ, सचिन शेवते, कानिफनाथ वाघ , सुरेश पवार, कांतीलाल चव्हाण, रमेश मदने, राजेश निकाळजे, राजेंद्र आडके, रामहरी पिंगळे, हनुमंत ननावरे, दत्तात्रय ननावरे, आनंदा ननावरे, महादेव चव्हाण, जयवंत खरात, दत्तात्रय कदम, संजय वाघमोडे, बाबासो टेबरे, मधुकर लांडगे, सुनील यादव, अनिल यादव, संदीप शेंडे, भगवान जगदाळे, बबनराव निकाळजे, लखन पिंगळे, राहुल यादव, राजेंद्र पाटोळे, अमर भोसले, सागर पाटोळे, अतुल पाटोळे, लक्ष्मण गायकवाड, कांतीलाल चव्हाण, सुधीर ओव्हाळ, अमोल तुपे, हनुमंत टेबरें, संतोष आडके, अमर टेंबरे, सोमनाथ गायकवाड, अनिल रिटे, सुनील रिटे, बाळकृष्ण रिटे, करण गोरवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सर्व तरुण मंडळ सोनगाव, सोनगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, ग्रामपंचायत सोनगाव, श्री विठ्ठल प्रासादिक भजनी व भारूड मंडळ सोनगाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, सोनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
दरम्यान, सर्व सत्कारमूर्तींना महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.