। लोकजागर । फलटण । दि. २७ मार्च २०२५ ।
फलटण शहरातील विविध प्रभागांमध्ये आज दिनांक २७ मार्च २०२५ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महायुतीच्या मार्फत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महायुती फलटण तालुका यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आज दिनांक २७ रोजी फलटण नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मध्ये झिरपे गल्ली, मंगळवार पेठ परिसर अंतर्गत काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन, प्रभाग क्रमांक ३ मध्ये आखरीरस्ता, मंगळवार पेठ येथील मातंग समाज मंदिराचे लोकार्पण हे कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता तर प्रभाग क्रमांक ६ मधील ब्राह्मण गल्ली अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण सायंकाळी ७ वाजता अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.