। लोकजागर । फलटण । दि. ०२ एप्रिल २०२५ ।
आसू ता.फलटण येथील मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. परिसरातील सर्व समाज बांधवांना एकत्रित करून सामुदायिक शुभेच्छा आणि शिरखुर्मा आस्वाद कार्यक्रमाचे आयोजन करून ऐक्याचा संदेश दिला.

यावेळी आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी विक्रीकर उपायुक्त रघुवीर माने पाटील, सरपंच महादेवराव सकुंडे यांच्यासह परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
आसू येथील मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मसमभावाचा दिलेला संदेश इतरांनी आदर्श घ्यावा असा आहे ,असे गौरवोद्गार आमदार सचिन पाटील यांनी काढले. त्यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शिवरूपराजे खर्डेकर यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद निमित्त येथील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांच्यावतीने सकाळी सामुदायिक नमाज पठण करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज पठण केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. आसू मशिजदचे मौलाना युसुफ यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लतिफ महात, माजी सरपंच जमीर महात,इक्बाल महात,शफी मेटकरी, बाशुद्दिन महात यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गावातील व परिसरातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्या दिल्या व शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.
पै.राजूभाई शेख, अब्दुल शेख, ॲड.खाजुभाई शेख, दिलीप शेख, अजमेर शेख, मुसा शेख, हुसेन शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.