फलटण येथे उद्या सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन

। लोकजागर । फलटण । दि. ०३ एप्रिल २०२५ ।

येथील आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या ज्ञानक्षेत्र फलटण येथील टी. ओ. के. हॉल, भडकमकरनगर याठिकाणी उद्या शुक्रवार ०४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते ४ या वेळेमध्ये हे शिवलिंगाचे दर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे.

‘‘1 हजार वर्षापूर्वी सोमनाथ मंदिरावरती प्रहार करून येथील शिवलिंग तोडले होते आणि त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री संत यानी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन 1 हजार वर्षे पूजा केली आणि त्यावेळी कांचीचे परमाचार्य यांनी सांगितले की, हे 1 हजार वर्ष बाहेर काढू नका आणि 1 हजार वर्षांनंतर बैंगलोर मध्ये स्थित गुरुदेव श्री. श्री. रविशंकरजी यांना नेऊन ते द्या आणि आता ते गुरुदेवांच्याकडे पोहोचले आणि यावर्षी महाशिवरात्रीला त्यांनी त्यावरती रुद्राभिषेक केला आणि आता गुरुदेव जिथे जात आहेत तिथे रुद्राभिषेक त्यावरती होत आहे आणि तेच सोमनाथ शिवलिंग फलटण मध्ये येत आहे’’, अशी माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली.

‘‘याठिकाणी शिवलिंगावर जल अर्पण करता येणार नाही, परंतु अक्षदा, फुल जरूर वाहता येतील. यासाठी जवळून दर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल. भाविकांनी या दुर्मिळ संधीचा उपयोग करावा’’ असे सांगून अधिक माहितीसाठी 9970342554, 7887472019, 9881485155 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love