श्री शिवप्रतिष्ठानकडून उद्या फलटणला श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभा यात्रा

। लोकजागर । फलटण । दि. ०५ एप्रिल २०२५ ।

रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी साजर्‍या होत असलेल्या श्रीराम नवमीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्यावतीने फलटण शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या शोभायात्रेचे तिसरे वर्ष आहे.

रविवार, दिनांक ६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिर येथून या शोभायात्रेचा शुभारंभ होणार असून तमाम श्रीराम भक्त व शिव भक्तांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम मंदिराजवळ शिवप्रतिष्ठानकडून प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेही आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे.

Spread the love