। लोकजागर । फलटण । दि. ०७ एप्रिल २०२५ ।
चुकीचे गाव व तालुका दुरुस्तीसाठीची सुविधा PM-KISAN पोर्टलवर बंद असल्याने सातारा जिल्ह्यातील काही लाभार्थी यांना पी.एम. किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणे बंद झालेले आहेत अशा तक्रारी प्राप्त होत आहेत.सदर अडचणी साठी केंद्र शासनास्तरावर पाठपुरावा करण्यात आला असून लवकरच सातारा जिल्हयासाठी चुकीचे तालुका व गाव दुरूस्ती करण्याचा टॅब सुरू केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

सातारा जिल्हयातील ज्या शेतक-यांचे तालुका व गावात बदल न झाल्याने पी.एम.किसान योजनेतील अनुदानाचे हप्ते बंद झाले आहेत व त्यासाठी गावात बदल करावयाचा आहे त्यांनी तातडीने संबंधित कृषी सहायक तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती. फरांदे यांनी केले आहे.
