फलटणच्या क्रांतीसूर्य प्रतिष्ठानकडून ‘आरोग्यसेवा’;

दिंडीतील वारकर्‍यांना केले औषधांचे वाटप

। लोकजागर । फलटण । दि. 20 जून 2025 ।

येथील क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्यावतीने संस्थापक मिलिंद नेवसे यांच्या हस्ते सद्गुरू सेवा मंडळाच्या दिंडीस औषधांचे वाटप करण्यात आले.

सद्गुरु सेवा मंडळाची दिंडी वडले, तिरकवाडी, दुधेबावी, कोळकी या परिसरातून निघते. या दिंडीत शंभर वारकरी सहभागी होतात. या दिंडीला गेली दहा वर्षे मिलिंद नेवसे औषधांचे वाटप करत असतात. यंदाच्या वर्षीही क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून औषधांचे वाटप करुन ‘आरोग्यसेवा’ देण्याची परंपरा त्यांनी जपली आहे.

यावेळी सद्गुरु सेवा मंडळ दिंडीतील हणमंतराव शिंदे, रामचंद्र ठोंबरे, यशवंत सोनवलकर, ईश्‍वरा ठोंबरे, बाळू सोनवलकर, भीमराव सोनवलकर उपस्थित होते.

Spread the love