विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेत श्रीराम विद्याभवनमध्ये नवागतांचे स्वागत

। लोकजागर । फलटण । दि. 20 जून 2025 ।

महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन आनंददायी वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व मुलांना गणवेश, पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प देऊन संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांनी औक्षण करून खाऊचे वाटप केले.

यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष शांताराम आवटे, ज्येष्ठ सदस्य बापूसाहेब मोदी, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. अलका बेडकिहाळ, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, चतुराबाई शिंदे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवले आणि शिक्षक, विदयार्थी उपस्थित होते.

नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचे नवीन शैक्षणिक वर्ष आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण जावो ही सदिच्छा व्यक्त करून आपल्या संस्थेच्या सर्वच शाखांचा गुणवत्तापूर्ण आणि शिस्तबध्द शिक्षणासाठी नावलौकिक आहे. तो वृध्दींगत व्हावा अशी अपेक्षा रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली. शांताराम आवटे, अलका बेडकिहाळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. दिपाली निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले. मनीष निंबाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर भिवा जगताप यांनी आभार मानले.

Spread the love