। लोकजागर । फलटण । दि. 21 जून 2025 ।
भारतीय जनता पार्टी – फलटण तालुका, महायुती, महाराजा योगा क्लब व योगविद्या योगासन वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महाराजा मंगल कार्यालयात योगासने करुन जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, श्री महाराजा व सद्गुरु संस्था समुहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांच्यासह भाजपा व महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, फलटणकर नागरिक सहभागी झाले होते.

उपक्रमावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, डॉ. प्रवीण आगवणे, श्री सदगुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, भाजपा नेते जयकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रामभाऊ ढेकळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

‘‘जागतिक योग दिनाच्या निमित्ताने फलटणमध्ये आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आरोग्यप्रेमी नागरिकांसाठी प्रेरणादायक ठरला. भारतीय संस्कृतीतील योगपरंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज अधोरेखित करण्यात आली’’, अशी प्रतिक्रिया आ. सचिन पाटील यांनी समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केली.

