यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये जागतिक योग दिन उत्साहात संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. 22 जून 2025 ।

शनिवार दिनांक २१ जून, २०२५ रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी योग शिबिर कार्यशाळेचे आयोजन प्रशालेच्या प्रांगणात करण्यात आले होते.

प्रशालेच्या वतीने आयोजित योग कार्यशाळेत योग शिक्षिका सौ. उषा धुमाळ यांनी उत्तम पद्धतीने प्रशिक्षण दिले. यामध्ये सूर्यनमस्कार योगासनाचे प्रकार, पद्मासन, गरुडासन, मयूरासन , वज्रासन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत घेण्यात आले.

योग दिनाच्या कार्यक्रमाकरिता प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी प्रशालेचे प्रभारी प्राचार्य प्रा. पी. डी. घनवट यांच्या हस्ते योग शिक्षिका सौ. उषा धुमाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ए. एस. तांबोळी , प्रा. डी. आर. माने यांनी केले तर आभार प्रा.जी. बी वाघ यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love