। लोकजागर । फलटण । दि. 24 जून 2025 ।
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण केंद्र क्रमांक १००२ येथे आज दिनांक २४ जून २०२५ पासून एस.एस.सी.बोर्ड पुरवणी परीक्षा जून -जुलै २०२५ सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक २३ जून, २०२५ रोजी या परीक्षा केंद्राची परीक्षा पूर्व पाहणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.

याप्रसंगी राजेश क्षीरसागर यांनी परीक्षा केंद्राची पूर्ण पाहणी केली. केंद्र क्रमांक १००२ ची पुरवणी परीक्षेची झालेली तयारी व विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा याविषयी समाधान व्यक्त केले व ही परीक्षा कॉपीमुक्त निर्भयपणे ,आनंदी वातावरणात पार पाडावी अशा सूचना करून एस. एस. सी. बोर्ड परीक्षे करिता केंद्रास व प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शालेय परिसरात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाबद्दल आनंद व समाधान व्यक्त करून प्रशासनाचे कौतुक केले.

प्रारंभी प्रशालेचे प्रभारी प्राचार्य पी. डी. घनवट यांनी राजेश क्षीरसागर यांचे शाल, श्रीफळ, श्रीरामाची प्रतिमा , पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजेश क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
