बेरोजगार सेवा संस्थाना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन .

। लोकजागर । सातारा । दि. 25 जून 2025 ।

शासकीय कार्यालयामधील स्वच्छतेसाठी सफाईगार या पदासाठी करा महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी ठेका पध्दतीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा येथे नोंदणीकृत असलेल्या बेरोजगाराच्या सहकारी सोसायटीस कामे वाटप करण्यात येणार आहेत. जिल्हयातील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था व इतर कार्यालयाची या पदासाठी मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत. सातारा जिल्हा सेवा कार्यक्षेत्र असलेल्या या कार्यालयांमध्ये नोंदणी पात्र व इच्छुक असणाऱ्या सेवा सोसायटी यांनी दिनांक ५ जुलै पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे व २८ जुलै २०२४ च्या शासन निर्णयान्वये संस्थानिहाय बंद लखोटयात दरपत्रके जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन सुनिल पवार सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र सातारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्रंमाक ०२६२ -२३९९३८ वर संपर्क साधावा.

Spread the love